मुंबई: मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं कालपासूनचं विसर्जनाची तयारी सुरू केली आहे. मोठमोठ्या मूर्त्यांची विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्याचं आव्हान मंडळांच्या कार्यकर्त्यांसमोर असणार आहे.



लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन यापुढे शास्त्रोक्त पद्धतीनं करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष तराफा तयार करण्यात आला आहे.



लिफ्ट पद्धतीचा तराफा तयार करण्यात आला आहे. शार्प शिपयार्ड कंपनीनं हा विशेष तराफा तयार केला आहे. त्यामुळे हा विसर्जनसोहळा अतिशय वेगळा असेल अशी आशा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



VIDEO: