फ्लायओव्हरवरील जॉईन्ट पॉईंटचा रबर सील पडल्यामुळे रस्त्याला भेग पडली होती. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
सध्या सीएसटी-दादर वाहतूक एक लेनमध्ये तर दादर - CST संपूर्ण वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
हा MMRDA चा ब्रिज आहे. त्यामुळे पोलीस आणि MMRDA चे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहे.
फ्लायओव्हरच्या रस्त्यात मोठा गॅप पडल्याने हा रस्ता पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. फ्लायओव्हरला भेग पडल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती.
यापूर्वीही लालबागचा हा फ्लायओव्हर भेगांमुळेच बंद करण्यात आला होता. आज पुन्हा या फ्लायओव्हरवरील वाहतूक रोखण्यात आली होती.
सतत पडणाऱ्या भेगांमध्ये रस्ता दुभागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक बनत आहे.
2011 मध्ये हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. तसेच काही महिन्यांआधीच या रस्त्यातील खड्डेही बुजवण्यात आले होते. त्यामुळे दुरुस्तीच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.