वसईतील थरारक अपघाताची CCTV दृश्यं
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 28 Sep 2016 04:21 PM (IST)
मुंबई: वसईत काल झालेल्या एका अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. वसईत शाळेच्या भरधाव वेगानं येणाऱ्या एकानं बसनं दुचाकी चालकास फरफटत नेलं. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. विल्यम लोपीस असं 50 वर्षीय दुचाकीस्वाराचं नाव आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दरम्यान वसई पोलीस स्टेशनमध्ये बस चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.