ठाणे : ठाण्याच्या कळवा परिसरात राहणाऱ्या एका आईने आपल्या गतिमंद असलेल्या जुळ्या मुलांची हत्या केली आहे. यानंतर महिलेनंही आत्महत्या केली आहे. गतिमंद मुलांना कंटाळून आपण हे कृत्य करत असल्याचं महिलेनं पत्रात लिहून ठेवलं आहे.


ठाण्यातील अर्चना कदम नावाच्या 32 वर्षीय महिलेनं आपल्या सार्थक आणि वरद कदम या गतिमंद जुळ्या मुलांची आज हत्या केली. महिलेनं मुलांच्या हत्येनंतर चिठ्ठी लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. पोलिसांना याची खबर मिळताच तातडीनं घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. यावेळी त्यांना महिलेची सुसाईड नोट सापडली आहे.

दरम्यान अर्चना कदम या महिलेचा पती एका खाजगी कंपनीत मॅनेजर आहे. आपल्या गतिमंद मुलांना कंटाळून तिने हे केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.