मुलगी झाल्याने सासरच्यांकडून छळ, मुंबईत विवाहितेची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2016 11:08 PM (IST)
मुंबई : मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून घाटकोपरमध्ये एका विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अंकिता फरिया-चरला हिचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घाटकोपरच्या कामा लेन इथल्या दीपालय बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अंकिताला चार महिन्यांपूर्वीच मुलगी झाली. मुलगी झाल्यानं तिच्या सासरची मंडळी नाखुश होती. त्यांनी तिचा छळ सुरु केला आणि त्याला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं. याप्रकरणी तिच्या सासू सासरे आणि पतीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. अंकितानं आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.