मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. कुर्ला - अंबरनाथ लोकलचे 5 डब्बे रुळावरुन घसरले. कल्याण - विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान ही दुर्घटना घडली. पहाटे 6 वाजून 3 मिनिटांनी कुर्ला - अंबरनाथ लोकलचे डब्बे घसरले असून, मध्ये रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.


लाईव्ह अपडेट :

कल्याण: 11 तासाच्या खोळंब्यानंतर पहिली लोकल सुटली, कल्याणहून कर्जतकडे 11तासानंतर पहिली लोकल रवाना

UPDATE : कुर्ला-अंबरनाथ लोकलचे डब्बे घसरल्याने खालील गाड्या वळवल्या :



UPDATE : बदलापूरहून सीएसटीसाठी आणखी एक विशेष लोकल 9.35 ला रवाना, तर केडीएमसीच्या एकूण 17 अतिरिक्त बस प्रवाशांच्या सेवेत

UPDATE : सीएसटीकडे जाणारी वाहतूक हळूहळू सुरु, 9.23 ला सीएसटीच्या दिशेने पहिली लोकल सोडली

UPDATE : 'या' लोकल रद्द आणि 'या' लोकल वळवल्या

  • सीएसटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

  • सीएसटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळवली

  • सीएसटी-चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस, सीएसटी-चेन्नई एगमोर एसी स्पेशल दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळवली

  • पुणे-हजरत निजामुद्दीन एसी स्पेशल कर्जत-पनवेल-वसई मार्गे वळवली


UPDATE : उद्यान एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळवली

https://twitter.com/Central_Railway/status/814305563899265024

UPDATE : कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यानची वाहतूक विस्कळीत, सीएसटी-कल्याण वाहतूक पूर्ववत, रेल्वे प्रशासनाची माहिती

UPDATE : मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस कर्जत, पनवेल मार्गे वळवल्या, रेल्वे प्रशासनाची माहिती

UPDATE : अंबरनाथ-कर्जत दरम्यान लोकल सेवा सुरु, ज्यादा बससाठी केडीएमसीला विनंती - मध्य रेल्वेचे पीआरओ ए के जैन

UPDATE : सीएसटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

https://twitter.com/Central_Railway/status/814301235440402432

UPDATE : सीएसटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जतहून वळवली

https://twitter.com/Central_Railway/status/814301825620934656

UPDATE : मध्य रेल्वेवरील कुर्ला-अंबरनाथ लोकल घसरली, ठाणे-सीएसटी वाहतूक सुरु, तर अंबरनाथ-कर्जत शटलसेवा सुरु



UPDATE : कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान लोकलचे 5 डब्बे घसरले, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प



UPDATE : कल्याण-कर्जत दरम्यानच्या सर्व गाड्या रद्द

UPDATE : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ज्यादा बसेस सोडण्याची मध्य रेल्वेकडून केडीएमसीला विनंती



UPDATE : ऐन सकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा, अनेक स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

UPDATE : संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल,डब्बे हटवण्याचं काम सुरु,अपघातात कोणीही जखमी नाही: मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांची माहिती

https://twitter.com/Central_Railway/status/814280763189268481

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. कुर्ला - अंबरनाथ लोकलचे 5 डब्बे रुळावरुन घसरले. कल्याण - विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान ही दुर्घटना घडली.

पहाटे 6 वाजून 3 मिनिटांनी कुर्ला - अंबरनाथ लोकलचे डब्बे घसरले असून, मध्ये रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद आहे.

लोकलसेवा तर ठप्प झालीच आहे, मात्र त्याचसोबत लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.