मुंबई: पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे. 'मुंबई महापालिकेतल्या माफिया राजचा लवकरच अंत होणार आहे.' अशा शब्दात किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घाटकोपरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी घेण्यात आलेल्या सभेमध्ये भाजप नेत्यांनी शिवसेनवर जोरदार टीका केली.
नोटाबंदीच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे. मात्र घाटकोपरच्या सभेत भाजप नेत्यांनी त्याची परतफेड केली आहे.