Kirit Somaiya on Sujit Patkar Ed Raids : मुंबईतील (Mumbai News) कथित कोविड सेंटरमध्ये (BMC Covid Scam) कोट्यवधींची घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. याच प्रकरणाी आज सकाळपासून ईडीकडून (ED Raids) मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. मुंबईतील तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अशातच संजय राऊत (Sanjay raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी,  पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. अशातच मुंबईत होणाऱ्या ईडीच्या छापेमारीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यावर ईडीनं छापे मारले आहेत. त्यांना उत्तर तर द्यावंच लागणार, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडी छाप्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "कोविड काळात अनेक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला होता, त्यावरून कारवाई होत असेल." 


सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीची छापेमारी 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. सांताक्रूझ पूर्व वाकोला येथील सुमित अरिस्ता बिल्डिंगच्या सी विंगमध्ये सुजित पाटकर राहतात. ईडीच्या पथकानं आज सकाळी त्यांच्या याच निवासस्थानी छापेमारी करण्यास सुरुवात केली. ईडीचे 6 ते 7 अधिकारी सकाळी 8 वाजता सुजित पाटकर यांच्या घरी आले. सुमारे 3 तास चाललेल्या छाप्यानंतर ईडीचं पथक सकाळी 10.45 वाजता सुजित पाटकर यांच्या निवासस्थानाहून निघून गेलं. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्यावर कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. 


संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर नेमके कोण? 


बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. आज याप्रकरणी ईडीनं मुंबईत तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली होती. या आरोपांना संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचं म्हटलं होतं.ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावं होती. लाईफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे, असं सुजित पाटकर म्हणाले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ED Raid in Mumbai : BMC कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवरही छापेमारी