INS Vikrant Case Kirit Somaiya : आयएनएस विक्रांत प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्याआधी सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर आतापर्यंत साडे सात हजार कोटी, ईडी सोबत पार्टनरशिप, जुहूच्या 100 कोटीचा प्लॉट, वसई पालघरमध्ये वाधवान सोबत 426 कोटी रुपयांचा आरोप, असे जवळपास एक डझन माझ्यावर आरोप लावलेत.  एसआयटी स्थापन केल्या मात्र खोदा पहाड निकला चूहा अशी स्थिती आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. 


सोमय्या म्हणाले की,  मी सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे.  राहिली गोष्ट आजची तर मला न्यायव्यवस्थेने सांगितले पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करा.  मी न्यायदेवतेचा सन्मान करतो. ठाकरे सरकार सारखा अपमान करत नाही. आज दुपारी एक वाजता आझाद मैदान कोर्टामध्ये कोविड हॉस्पिटल घोटाळा संदर्भात मी याचिका केली आहे त्यावर आज सुनावणी आहे.  ठाकरे सरकार त्या सुनावणीमध्ये हजर राहण्यास मुभा देता का हे पाहू, असं ते म्हणाले. 
 
विक्रांत घोटाळ्याबाबत सलग चार दिवस त्यांची चौकशी होणार आहे. याबरोबरच किरीट सोमय्या मुंबई मनपा कोरोना केस संदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्यात देखील जाणार असल्याचे समजत आहे. 


किरीट सोमय्या आज चौकशीला हजर राहणार आहेत. चौकशीला हजर राहण्यासाठी सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले होते. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो खटला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि निल सोमय्या या दोघांनाही चौकशासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी न येता त्यांच्या वकिलांना पाठवत असल्याचे समोर आले होते. मागच्या वेळेस किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर नव्हते, तेव्हा त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आज किरीट सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. 



अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला


आयएनएस विक्रांत बचाव घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज  कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यात सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. किरीट सोमय्या जर चौकशीसाठी हजर राहिले नाही, तर त्यांना फरार घोषित करण्यात येईल, असा इशाराही गुन्हे शाखेने दिला आहे.