एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रात्री किरीट सोमय्या गरबा खेळत होते?
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2017 11:17 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठते आहे. काल एलफिन्स्टन स्टेशनच्या पुलावर चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच खासदार किरीट सोमय्या हे गरबा खेळण्यात दंग होते का, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. किरीट सोमय्या यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ एलफिन्स्टन दुर्घटनेच्या आधीचा आहे की नंतरचा, याबाबत मात्र अद्याप खातरजमा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियातही किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, खासदार किरीट सोमय्या यांची या व्हिडीओबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्वीट : https://twitter.com/Awhadspeaks/status/914159428076756994 व्हिडीओ :