kirit Somaiya Maharashtra Mumbai Latest News Updates : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला. किरीट सोमय्या खार पोलिस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ केला.पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या. 


शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांचा वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यावेळी सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझा FIR घेत नाहीत, त्यांनी माझ्या नावाने खोटा FIR लिहिला असल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर केला आहे. तर पोलिसांवर मुख्यमंत्रांचा दबाव असल्याची टीका सोमय्यांनी केली. हा मला जीवे मारण्याचा तिसरा प्रयत्न आहे. आधी वाशीम नंतर पुणे आणि आता मुंबईत. 50 पोलिस असताना शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिस आयुक्त काय करत आहेत? इतक्या प्रमाणात शिवसेनेचे लोक पोलिस स्टेशन परिसरात कसे आले? असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी केले आहेत.


दरम्यान पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी म्हटलं आहे की, किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून आम्ही FIR दाखल केला आहे. त्यानुसार पुढील तपास केला जाईल.


सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले अन्


मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणावरुन भाजप आणि शिवसेनेत काल काल झालेल्या गोंधळानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याआधी राणांनी पंतप्रधानांचा दौरा असल्यानं आंदोलन वापस घेत असल्याचं सांगितलं. मात्र नंतर त्यांना अटक केल्यानं गोंधळ वाढला. भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले आणि तिथं शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. 


भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून शिवसेनेशी पंगा घेतल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना काल अटक झाली. त्यांना खार पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानं तणाव निर्माण झाला होता. 


राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याची भेट घेतली.  किरीट सोमय्या खार पोलिस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी एकच गोंधळ केला. राणा दाम्पत्याच्या नौटंकीमागे भाजपच असल्याचा दावा यावेळी शिवसैनिकांनी केला. शिवाय सोमय्या आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या तर शिवसैनिकांनी सोमय्यांनीच गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हटलं आहे.


शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्यादेखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसैनिकांच्या हल्ल्यात गाडीची काच फुटली असून आपण जखमी झाल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. तर याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर सोमय्यांनी आपल्या गाडीतच ठिय्या दिला. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत गाडीतून उतरणार नाही असा पवित्रा सोमय्यांनी घेतला होता.