Kirit Somaiya News : हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठं लपवलं आहे हे मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) सांगावं. ठाकरे परिवाराशी संबंध असलेल्या चतुर्वेदीला फरार घोषित करा. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्याशी चतुर्वेदीचे व्यवहार समोर आले आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे. बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपनी एकाच पत्तावर रजिस्टर आहेत. ते चतुर्वेदी गायब आहेत, त्यांना फरार घोषित करावं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
येत्या काळात त्यांना कोर्टातून वॉरंट निघेल अशा विश्वास आहे. आदित्य आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांचा व्यवहार आहे हे मी आधी सांगितलं होतं, असंही सोमय्या म्हणाले.
सोमय्या यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात 29 कोटी काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.
माझ्या विरोधात आरोप करणारे प्रवीण कलमे कुठे?
सोमय्या यावेळी म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे वाझे असलेल्या प्रवीण कलमे यांनी माझ्या विरोधात आरोप केले. ते प्रवीण कलमे कुठे आहेत, याची माहिती जितेंद्र आव्हाड देणार का? कलमे भारतात आहेत की विदेशात, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी म्हटलं की, कलमे यांनी सरकारी फाईलमधून कागद चोरले आहेत. सरकार कारवाई का कारवाई करत नाही. कलमे यांना जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली? अनिल परब यांनी मदत केली की उद्धव ठाकरे यांनी मदत केली? असाही सवाल त्यांनी केला. प्रवीण कलमे यांना फरार घोषित केलं जावं अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
कोण आहेत प्रवीण कलमे?
याआधीही किरीट सोमय्यांनी त्यांचं नाव घेतलं होतं, त्यांना गृहनिर्माण विभागाचा सचिन वाझे संबोधलं होतं..
अर्थ एनजीओचे संस्थापक आहेत..
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए आणि महाडा या संस्थांमधून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते आणि हे काम प्रवीण कलमे यांना सोपवण्यात आले होते असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
यावर कलमेंनी अब्रु नुकसानीचा दावा टाकला होता.