मुंबई : मुंबई मॅरेथॉन 2019 मोठ्या उत्साहात पार पडली. केनियाच्या कॉसमन लॅगटने 42 किमीच्या मुख्य मॅरेथॉनचं विजेतेपद पटकावलं. तर महिला गटात इथियोपियाची अलेमू हिने बाजी मारली. मुख्य मॅरेथॉन भारतीय पुरुष गटात नितेंद्र सिंग रावतने अव्वल स्थान पटकावलं, तर भारतीय महिला गटात सुधा सिंह विजेपदाचा मान पटकावला.
अर्ध मॅरेथॉनमध्ये (21 किमी) पुरुष गटात लष्कराच्या श्रीणू मुगाताने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं, तर महिला गटात मीनू प्रजापतीने बाजी मारली.
मुंबई मॅरेथॉनला सकाळी 5:30 वाजता सुरुवात झाली होती. सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पीटल - महालक्ष्मी-वरळी सी लिंक - माहिम चर्च - सिद्धिविनायक मंदिर - नेहरु सायन्स सेंटर - सीएसटी असा मॅरेथॉनचा मार्ग होता.
तर अर्ध मॅरेथॉनची सुरुवात ही वरळी सी-लिंकपासून होणार असून महालक्ष्मी रेस कोर्स-विल्सन कॉलेज-वानखडे स्टेडियम-आझाद मैदान असा मार्ग होता.
धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबई मॅरेथॉनची ब्रँड अॅम्बेसेडर मेरी कोमसुद्धा उपस्थित होती. मेरी कोमने मॅरेथॉनचं प्लॅगऑफ केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, अनिल अंबानी, टीना अंबानी, गुलशन ग्रोवर आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.
मुंबई मॅरेथॉन विजेते
मुख्य मॅरेथॉन स्पर्धा (आतंरराष्ट्री पुरुष 42 किमी)
कॉसमॉस लगाट (केनिया, प्रथम)
ए. बॅण्टी (इथिओपिया, द्वितीय)
शुमीट एकलन्यू (इथिओपिया, तृतीय)
मुख्य मॅरेथॉन स्पर्धा (भारतीय पुरुष 42 किमी)
नितेंद्रसिंह रावत (प्रथम)
टी गोपी (द्वितीय)
करणसिंग (तृतीय)
मुख्य मॅरेथॉन भारतीय महिला (42 किमी)
सुधा सिंग (प्रथम)
ज्योती गवते (द्वितीय)
जिग्मेट (तृतीय)
हाफ मॅरेथॉन पुरुष विजेते
श्रीणू मुगाता (प्रथम )
करण थापा (द्वितीय)
कालिदास हिरवे (तृतीय)
हाफ मॅरेथॉन महिला विजेत्या
मिनू प्रजापत, राजस्थान पोलिस (प्रथम)
साई गिता नाईक, मुंबई पोलीस(द्वितीय)
मंजू यादव, रेल्वे (तृतीय)