मुंबई: मुंबईच्या केसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी एक अभिनव उपक्रम राबवत युवा शक्तीचा आदर्श उभा केला आहे. केसी कॉलेजच्या जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी पालघर जिल्ह्यात  107 शौचालय बांधून दिले आहेत. यापैकी बरेचसे शौचालय हे करवाळे गावात बांधण्यात आले आहेत.


नॅशनल सव्हिर्स स्किमच्या (NSS) माध्यमातून हे शौचलय बांधण्यात आले आहेत. 2005 मध्ये केसी कॉलेजने करवाळे गाव दत्तक घेतले होते. सोयी सुविधांचा अभाव लक्षात घेता केसी कॉलेजने या गावचा कायापालट केला.

या गावात जवळपास साडे तीनशेहून अधिक घरं आहेत. एनएसएसच्य माध्यमातून 2015 मध्ये 300 विद्यार्थ्यांची एक टीम बनवण्यात आली. दर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवसात विद्यार्थ्यांनी पालघर जिल्ह्यात जाऊन 107 शौचालय बांधले. त्यांच्या या कामाच सर्व स्तरावरुन कौतूक होताना पाहायला मिळतं आहे.