उल्हासनगर:  महापालिकेत प्रतिनियुक्तीवर अतिरिक्त आयुक्तपदी करुणा जुईकर आल्या आता त्यांच्या एक वर्षाचा प्रतिनियुक्तीचाही कालावधी संपून एक वर्ष झाले आहे. त्यानंतर शासनाचा कोणताच आदेश नसताना त्या महापालिकेत ठाण मांडून बसल्याची टीका होत आहे. दरम्यान महापालिकेच्या (Ulhasnagar News) या अनागोंदी कारभारावर सामाजिक कार्यकर्ते राज असरोडकर यांनी शासनाकडे लेखी तक्रार केलीय. लवकरात लवकर बेकायदेशीर नियुक्त असलेले अतिरिक्त आयुक्त करुणा जाईकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय.


दरम्यान आयुक्त अजीज शेख यांनी जुईकर यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. उल्हासनगर पालिकेत अधिकाऱ्यांची 70 तर कर्मचाऱ्यांची 40% पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. रिक्त जागी प्रतीनियुक्तीवर अधिकारी पाठवण्याची मागणी शासनाकडे आयुक्तांनी करूनही मागणीला शासनाकडून केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ऑगस्ट 2020 रोजी अतिरिक्त आयुक्तपदी करुणा जुईकर यांची एक वर्षासाठी पद नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट 2021 साली त्यांचा पदनियुकतीवरील कालावधी संपल्यानंतर नगर विकास विभागाने 16 फेब्रुवारी 2021 रोजी जुईकर यांना एक वर्षा ची मुदतवाढ दिली, ऑगस्ट 2022 रोजी दिलेली एक वर्षाची मुदतवाढ संपल्यानंतर नगरविकास विभागाने मुदत वाढीचे आदेश दिले नाही, किंवा त्यांना परत बोलावले नाही, मात्र कोणताही आदेश नगरविकास विभागाचे नसताना जुईकर ह्या अतिरिक्त पदावर गेल्या एक वर्षांपासून ठाण मांडून बसल्या आहेत.


जुईकर यांच्या बदलीचे अद्याप कोणतेही अधिकार प्राप्त झालेले नाही


आयुक्त अजीज शेख यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,  महापालिकेने मुदतवाढ मिळावी यासाठी सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र पत्र पाठवल्यानंतर अदयाप आम्हाला शासनाचे कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही. उल्हासनगर महापालिकेत दोन अतिरिक्त जागा आहे.  जुईकर  या शासनाच्या सेवेत कार्यरत आहे. जुईकर यांच्या बदलीचे अद्याप कोणतेही पत्र प्राप्त झालेली नाही त्यामुळे त्या पदावर कार्यरत आहे. तसेच जुईकर यांच्या जागेवर देखील दुसऱ्या अधिकाऱ्याची बदली केलेली नाही. 


जुईकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप


सामाजिक कार्यकर्ते  राज असरोडकर म्हणाले, करूणा जुईकर यांना राज्य शासनाचा कोणताही आदेश नसताना त्या पदावर कार्यरत आहे. उल्हासनगर महापालिकेसाठी त्यांची नेमणूक नसताना देखील त्या उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीतून पगार घेत आहे. करूणा जुईकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे देखील आरोप आहे. जुईकर या 2020 साली प्रतिनियुक्तीवर उल्हासनगर महापालिकेत ऋजू झाल्या. त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी ऑगस्ट 2021 मध्ये संपुष्ठात आला. फेब्रुवारी 2022 पर्यंत त्या कोणताही आदेश नसताना काम करत होत्या. त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली. ऑगस्ट 2022 पर्यंत ही मुदत संपुष्ठात आली. त्यानंतर त्या आजपर्यंत वीनाआदेश काम करत आहे. मुदतवाढ नसताना देखील त्या काम करत आहे. शासनाकडे याच्या  लेखी तक्रारी केल्या आहेत.  मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.


हे ही वाचा :