Kareena Kapoor Covid Positive : अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. यावर मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभिनेत्रींना सुनावले. 'दोन लहान मुलं, तरी इतकं बिनधास्त कसे?',असा सवाल किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला आहे. 


किशोरी पेडणेकर म्हणाल्या,"बॉलिवूडकरांनी नियम पाळायला हवेत. तसेच राजकिय लोकांनीदेखील नियमांचे पालन करायला हवे. ग्रॅन्ड हयातमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नियम मोडले जात आहेत. बॉलिवूड आणि राजकिय क्षेत्रातील लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा सध्या होम क्वारंटाईन आहेत. दोघींवर पालिकेचं लक्ष आहे. करिना कपूरला दोन लहान मुलं आहेत, तरी इतकं बिनधास्त". 


महापौर पुढे म्हणाल्या,"ज्यांनी विचारलं कोरोना कुठे आहे त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडमधील जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने वागले पाहिजे. माझं प्रामाणिक मत आहे की,आपले मुख्यमंत्री काटेकोर नियमांचं पालन करत आहेत तर राजकिय व्यक्तींनीदेखील नियम पाळले पाहिजेत." हॉटेलधारकांनादेखील महापौरांनी ईशारा दिला आहे. नियम पाळले जाणं ही हॉटेलधारकांचीही जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. 


करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्या सर्वांची आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केली आहे. या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सूपर स्प्रेडर ही ठरू शकण्याची शक्याता सूत्रांनी व्यक्त केली आहे. आज आणखी काही बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचे कोरोना रिपोर्ट येणार आहेत. करीना आणि अमृता यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची बीएमसीने कोरोना चाचणी केली आहे. त्यांच्या रिपोर्ट्सकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. ज्या मध्ये काही मोठ्या बॉलिवूड सूपरस्टारांची नावं असल्याची माहीती मिळत आहे. 


संबंधित बातम्या


करीना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह , अनेक पार्ट्यांना हजेरी, सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती


लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मुंबई लोकलनं प्रवासाची मुभा देण्यावर ठाम आहात का? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल


Corona in Mumbai : मुंबईकरांनो काळजी घ्या!, कोरोना वाढीचा दर वाढतोय