मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद काही मिटण्याचं नाव घेताना दिसत नाही. आज गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या संदर्भातील माहिती देणारे ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यावर कंगना हिने हे राऊत यांचे ट्विट रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.


काय आहे संजय राऊत यांचे ट्विट?
गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे.




कंगनाचे ट्विट? काय आहे?

एक होती सिंहींण... आणि एक लांडग्यांचा कळप!


काय आहे प्रकरण?
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांनी त्यांच्या घरी बोलावून ऋतिक रोशन प्रकरणात आपल्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, हा सल्ला देताना त्यांनी आपला आवाज खूप जास्त चढवला होता, इतका की आपला थरकाप उडाला असा दावा कंगनानं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कंगनाची बहिणी रंगोली हिनंही या घटनेची पुष्टी करत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट टाकल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होतेय, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी आता कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचं समतंय.


कंगना रनौतच्या अडचणी आणखी वाढल्या? गीतकार जावेद अख्तर यांचाही अब्रुनुकसानीचा दावा


कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप सोशल मीडियावर आणि रिपब्लिकच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे. दिग्दर्शक महेश भट आणि अख्तर यांचा यामध्ये थेट उल्लेख केलेला होता. सोशल मीडियावर या व्हिडीओला लाखो हिट्स मिळाले आहेत.