28 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, बेडरुममध्ये 6 वर्षीय मुलीचा मृतदेह
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2016 02:26 AM (IST)
मुंबई : मुंबईत एका 28 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत्या घरी या महिलेने गळफास घेतला. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेहही आढळून आला. नवऱ्याशी झालेल्या भांडणातून महिलेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी अधिक माहितीसाठी पीडित महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी कलम 302 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे.