मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
एबीपी माझा वेब टीम | 29 Dec 2017 08:22 AM (IST)
अत्यंत उच्चभ्रू असलेल्या या परिसरात इतकी मोठी आग लागल्याने लोकांनी सोशल मीडियावरही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुर्घटनेच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी आगीचे व्हिडीओ ट्विटर, फेसबुकवर पोस्ट केले.
मुंबई : लोअर परळमधील प्रसिद्ध कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागली. हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पब आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं. गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास आगीची घटना घडली. अत्यंत उच्चभ्रू असलेल्या या परिसरात इतकी मोठी आग लागल्याने लोकांनी सोशल मीडियावरही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुर्घटनेच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी आगीचे व्हिडीओ ट्विटर, फेसबुकवर पोस्ट केले. आगीची भीषणता दाखवणारे फोटो, व्हिडीओ ट्विटरवर पाहायला मिळत आहेत. त्यातील काही निवडक ट्वीट :