कमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2017 11:41 AM (IST)
भायखळा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मुंबई : कमला मिल्स कम्पाऊण्ड आग प्रकरणी '1 अबव्ह'चे मालक जिगर आणि कृपेश संघवी यांच्या काकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दोघांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी काकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात येत आहे. भायखळा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कमला मिलमधील 'मोजोस् बिस्रो' आणि '1 अबव्ह' या हॉटेलांना गुरुवारी रात्री आग लागली होती. यामध्ये 14 जणांचा होरपळून/गुदमरुन मृत्यू झाला. आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत. अग्नितांडवात 14 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली आहे. काय आहे प्रकरण? मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. कमला मिलमधील ‘ते’ हॉटेल शंकर महादेवनच्या मुलाचं 1 Above पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. ‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’ आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार : मुख्यमंत्री विनापरवाना हॉटेल पाडायलाच हवे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दुपारी आग लागलेल्या ठिकाणी भेट दिली. कमला मिल परिसरातील अग्नितांडव ही अतिशय दुर्देवी घटना असून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिलं. या घटनेची चौकशी करण्यासाठी अजॉय मेहतांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे पाच अधिकाऱ्यांवर कारवाई कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिल्सच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. निलंबित अधिकारी मधुकर शेलार, पदनिर्देशित अधिकारी धनराज शिंदे, ज्युनिअर इंजिनियर महाले, सब इंजिनिअर पडगिरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी एस. एस. शिंदे, अग्निशमन अधिकारी अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू सामाजिक कार्यकर्त्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते इलियास इजाज खान यांनी 1 Above हॉटेलची सात महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती. यानंतर आरोग्य विभागाने इथे तपासणी करुन अहवाल सादर केला होता. यामध्ये अवैधपणे हॉटेल बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आरोग्य विभागाचे निरीक्षक पी एम शिर्के यांनी 1 Above हॉटेलमालक कृपेश संघवी यांना जुलैमध्ये नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये हॉटेलचा अनधिकृत भाग सात दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही हॉटेल अवैधरित्या चालूच होतं.