रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2017 08:07 AM (IST)
दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी प्रेमप्रकरणातून दोघांनी जीव दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
प्रातिनिधीक फोटो
कल्याण : कल्याणजवळच्या बदलापूरमध्ये एक तरुण आणि तरुणीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे दोघं जण मूळ रत्नागिरीचं असल्याची माहिती आहे. सुरेश शिंदे असं 23 वर्षीय तरुणाचं नाव असून त्याच्यासोबत असलेली युवती 19 वर्षांची होती. दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी प्रेमप्रकरणातून दोघांनी जीव दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मध्य रेल्वेवरील बदलापूर आणि वांगणी स्थानकांच्या दरम्यान दोघांनी आयुष्य संपवलं. शनिवारी रात्री 8.30 ते 9 वाजताच्या दरम्यान रेल्वे पोलिसांना या प्रकाराची माहिती समजली, मात्र नेमकं किती वाजता दोघांनी आत्महत्या केली, हे समजू शकलेलं नाही. दोघांचेही मृतदेह उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिस तरुण-तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.