कल्याणमधील मुरबाडच्या म्हासड गावात आजी आजोबांची शाळा भरते. लहान मुलांना लाजवेल अशा उत्साहात हे सगळे शाळेत येतात.
गुलाबी साडीतल्या आज्जीबाई सिनीअर विद्यार्थिनी, तर पिवळ्या साडीतल्या आज्या ज्युनिअर. आजोबांना मात्र एकच गणवेश, पांढरं धोतर आणि सदरा. या शाळेनं आजी-आजोबांच्या आयुष्यात जादूच घडवली आहे.
या शाळेतले सगळे विद्यार्थी सत्तरी ओलांडलेले. विशेष म्हणजे या वयातही आजी-आजोबांचं पाठांतर अगदी खणखणीत आहे. आयुष्याच्या सांजवेळी शिक्षणाची कास धरणारे हे सगळे आज्जी-आजोबा अनेकांसाठी आदर्श ठरत आहेत.