कल्याणमध्ये विहिरीत बुडून तीन कामगार, अग्निशमनच्या दोन जवानांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 01 Nov 2018 03:23 PM (IST)
विहीर साफ करण्यासाठी उतरलेले कामगार बराच वेळ बाहेर न आल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं.
प्रातिनिधीक फोटो
कल्याण : कल्याणमध्ये विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. केमिकलच्या पाण्यामुळे पाच जणांना प्राण गमवावे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कल्याण पूर्वमधील नेतीवली लोकग्राम परिसरात एक विहीर आहे. विहीर साफ करण्यासाठी तीन कामगार आत उतरले होते. बराच वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न आल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. अग्निशमनचे दोन जवान कामगारांच्या शोधासाठी विहिरीत उतरले, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला. या विहिरीत केमिकलचं पाणी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फायर ब्रिगेड कर्मचारी असलेले अनंता शेलार, प्रमोद वाघचौरे तर राहुल गोस्वामी, गुणा गोस्वामी या स्थानिक कामगारांचा मृत्यू झाला. पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.