कल्याण : मद्यधुंद कारचालक महिलेचा धिंगाणा, बसलाही धडक
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2016 08:31 AM (IST)
कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलावर एका उच्चभ्रू कुटुंबातील महिलेने मद्यधुंद अवस्थेत अक्षरशः धिंगाणा घातल्याचं वृत्त आहे. तिने पोलिसांसह सामान्य नागरिकांनाही भररस्त्यात मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. महिलेच्या धिंगाण्यामुळे तब्बल दीड तास पत्रीपूल परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महिला तिची महिंद्रा एसयूव्ही कार चालवत होती. मद्यधुंद अवस्थेत तिने एका बसलाही धडक दिली होती. मद्याचा अंमल इतका जास्त होता, की तिला एका जागेवर उभंही राहत नसल्याचं म्हटलं जातं.पोलिसांनी या महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ती पोलिसांनाही जुमानत नव्हती, तर तिचं मोबाईल शूटिंग करणाऱ्या काही जणांच्या अंगावरही ती धावून गेली. तासभर हा धिंगाणा थांबत नसल्यानं कोळसेवाडी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.