Kalyan Dombivli News : यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीतील (Kalyan Dombivli) खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याचे विदारक वास्तव, नागरिकांना होणारा त्रास एबीपी माझानं दाखवल्यानंतर आता खडबडून जागं झालेल्या केडीएमसीनं खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं आहे. तसेच पालिका क्षेत्रात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसीच्या अखत्यारीत काही रस्ते असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी  संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत केडीमसीनं पावसामुळे खड्डे बुजवताना अडचणी येत असल्या तरी कोल्ड मिक्स,पेव्हर ब्लॉक, खडीकरण आणि रेडीमिक्सच्या माध्यमातून खड्डे भरण्याची कामं सुरू करण्यात आली आहे. 


महापालिकेच्या 10 प्रभागांसाठी 13 ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली असून 24 तास हे काम सुरू असून  जवळपास 1500 ते 2000 चौमी खड्डे भरण्याचे काम करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. तर खड्ड्याबाबत तक्रारींसाठी देण्यात आलेल्या टोल फ्री नंबरवर आतापर्यंत 247 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामधील सुमारे 150 हून अधिक तक्रारींची दखल घेतल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. 



पालिका क्षेत्रातील रस्त्याची झालेली चाळण पाहता या रस्त्यावरून वाहनं चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. पावसानं उसंत घेताच पालिका प्रशासनानं रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचं काम सुरु केलं आहे. तर दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतच्या तक्रारींसाठी पालिका प्रशासनानं दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. हा क्रमांक नागरिकांच्या हातात पडताच त्रस्त नागरिकांनी तक्रारींचा धडाका लावला आहे. याबाबत केडीएमसीनं जुलै महिन्यात आतापर्यंत सतत जोरदार पाऊस सुरू राहिल्यानं रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळं खड्डे भरण्याच्या कामातही अडचणी येत आहेत. या परिस्थितीत कोल्ड मिक्स, पेव्हर ब्लॉक, खडीकरण आणि रेडीमिक्सच्या माध्यमातून खड्डे भरण्याची कामं सुरू ठेवण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. महापालिकेच्या 10 प्रशासकीय प्रभागांसाठी 13 ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज जवळपास 1500 ते 2000 चौमी खड्डे भरण्याचं काम करण्यात येत असल्याचा दावा केडीएमसीकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, महापालिका क्षेत्रातील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसीच्या अखत्यारीत काही रस्ते असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :