मुंबई : कल्याण-सीएसटी लोकल रुळावरुन घसरली आहे. कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ‘1-ए’वरुन लोकल सीएसटीच्या दिशेने निघाली असताना पत्री पुलाजवळ रुळावरुन घसरली.
कल्याण स्थानकावरील क्रमांक 1 आणि 1-ए प्लॅटफॉर्मवरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. कल्याण स्थानकाहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरुन सोडल्या जात आहेत.
अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. डोंबिवली-कल्याण रेल्वेस्थानकांदरम्यानची वाहतूक फास्ट ट्रॅकवरुन सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत कुणीही जखमी झाला नसल्याची माहिती मिळते आहे.