कल्याणमध्ये 93 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
एबीपी माझा वेब टीम | 11 Apr 2018 11:16 AM (IST)
चोरीच्या उद्देशाने 93 वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे
कल्याण : कल्याणमध्ये 93 वर्षांच्या वृद्धाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणजवळ असलेल्या मोहोने भागात हा प्रकार घडला. महादेव जयराम जाधव मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचं नाव आहे. मंगळवारी रात्री बेड्यावर म्हणजे गायी-म्हशींच्या गोठ्यात झोपलेले असताना अज्ञातांनी त्यांची हत्या केली. चोरीच्या उद्देशाने महादेव जाधवांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.