मुंबई : जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका ही मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेला बगल देण्यासाठीच दाखल झालीय. जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही डाववलं जात असल्याचा खळबळजनक आरोप बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अहमद आब्दी यांनी केला आहे.


आब्दी यांनी जस्टिल लोया यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत आब्दीही अर्ज दाखल करून ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी करणार आहेत.

कारण, जस्टिय लोया हे मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील कोर्टात कार्यरत होते. तसेच त्यांचा मृत्यूही महाराष्ट्रातच झालाय. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणीही महाराष्ट्रातील सर्वोच्च कोर्टात व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

याशिवाय लोया प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेलाही डावललं जात असल्याचा आरोप अहमद आब्दी यांनी केला.

4 जानेवारीला ही याचिका हायकोर्टात सादर होऊनही 12 जानेवारीपर्यंत या याचिकेला नंबर देण्यात आला नव्हता. कोणत्याही याचिकेला नंबर देण्यासाठी 2-4 दिवसांचा कालावधी लागतो. मग जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी दाखल याचिकेला नंबर देण्यासाठी इतका वेळ का? यासंबंधी हायकोर्ट रजिस्ट्रारच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखवण्याची तयारी करताच 15 मिनिटांत या याचिकेला नंबर देण्यात आला, असा दावाही आब्दी यांनी केलाय. त्यामुळे या याचिकेवरची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या :

या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?