Jitendra Awhad Controversial Tweet: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) भाजपने जोरदार टीका केली होती. त्यानंतर आव्हाडांनी एक खोचक ट्वीट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, 'रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.' त्यांच्या या ट्वीटनंतर शिंदे गटासह भाजपनं हल्लाबोल केला आहे.


नेमकं ट्वीटमध्ये काय म्हणाले आहेत आव्हाड


आव्हाड (Jitendra Awhad) ट्वीट करून म्हणाले आहेत की, ''रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्ण -अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा.'' त्यांनी आपल्या या ट्वीटसह 'आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा', असं हॅशटॅग देखील दिलं आहे.






Jitendra Awhad Controversial Tweet: 'आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलं' 


आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या ट्विटनंतर शिंदे गट (Shinde Group) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आव्हाडांच्या या ट्विटवर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले आहेत की, ''हा हिंदुत्वाला डिवचण्याचा प्रयत्न आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीला डिवचण्याचा हा प्रयत्न आहे. ते म्हणाले, आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. यामागचं कारण म्हणजे, त्यांचे कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील सर्व नगरसेवक त्यांना सोडून चालेल आहे. काही दिवसात हे दिसेल. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुल बिघडलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत.'' 


Jitendra Awhad Controversial Tweet: ठाकरेंचा आव्हाडांना पाठिंबा? 


नरेश मस्के पुढे म्हणाले, ''ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा मार्ग दिला. त्या हिंदुत्त्वाच्या विरोधात वागणाऱ्या लोकांना तुम्ही (उद्धव ठाकरे) आपल्या बाजूला बसवत आहात. मांडीला-मांडी लावून बसवत आहात, गळ्यात-गळे घालत आहात. त्यांच्यासोबत आघाडी करत आहेत. यात जी काय त्यांची भूमिका आहे, यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका आधी स्पष्ट करावी, त्यांचा आव्हाडांना (Jitendra Awhad) पाठिंबा आहे? का त्यांच्या विधानाला विरोध आहे? हे आता महाराष्ट्रात महत्वाचं आहे.''    


Jitendra Awhad Controversial Tweet: रावसाहेब दानवे यांच्या कार्यालया बाहेर आव्हाडांचा पुतळा जाळून निषेध आंदोलन


जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलना दरम्यान आव्हाड यांनी जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी केलीय. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवरायांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाद्वारे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा पुतळा जाळून निषेध केला. यावेळी या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आवाडांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांची जीभ छाटणाऱ्यास बक्षिसाची घोषणा केली आहे.