मुंबई : 'जेट एअरवेज' कंपनीच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. जेट एअरवेजची बहुतांश विमानं काल रात्रीपासून जमिनीवर आहेत. शुक्रवार संध्याकाळपर्यंत जेटची विमानं उड्डाण घेणार नसल्याची माहिती आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन कालपासून जेटच्या विमानांची उड्डाणं जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
जेट एअरवेज सध्या गंभीर आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे. नरेश गोयल यांनी काही दिवसांपूर्वीच जेट एअरवेजच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
'जेट एअरवेज'ने 'ऑपरेशनल इश्यूज'चं कारण देत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली आहेत. जेट एअरवेजच्या विमानांना डीजीसीएने उड्डाण करण्यास परवानगी नाकारल्याची माहिती आहे.
'एतिहाद एअरवेज'ने 'जेट'मध्ये रस दाखवला असून ही विमानं भाडेतत्त्वावर 'एतिहाद'सारख्या इतर विमान कंपन्यांद्वारे संचालित केली जाऊ शकतात.
दरम्यान, अनेक प्रवासी विमानतळावरच अडकले आहेत. प्रवाशांनी गैरसोयीबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आणि सीआयएसएफची फौज तैनात करण्यात आली आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'जेट एअरवेज'ची विमानं जमिनीवर, बहुतांश उड्डाणं रद्द, प्रवाशांचा खोळंबा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Apr 2019 09:32 AM (IST)
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन कालपासून जेटच्या विमानांची उड्डाणं जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -