याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चेतन चौगुले हा आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलासह एमआयडीसी कामगार वसाहतीमध्ये राहतो. चेतन सध्या काहीच कामधंदा करीत नव्हता. पती- पत्नीमध्ये दररोज भांडणं व्हायची. भांडणं होण्याच्या इतर कारणांबरोबर यूट्यूब हे दोघांच्या भांडणांतील एक प्रमुख कारण असल्याची माहिती मिळाली आहे.
यूट्यूब पाहून विद्यार्थ्याने आठ फुटी 'रायगड' साकारला | सांगली | एबीपी माझा
दरम्यान घटना घडली त्या रात्री आरतीने चेतनकडे एक हजार रुपये खर्चासाठी मागितले परंतु त्याने पैसे देण्यास त्याने नकार दिला. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर रात्री चेतन झोपी गेला. तर आरती युट्यूबवर व्हिडीओ पाहू लागली.
पहाटे चारच्या सुमारास चेतनला जाग आली तेव्हादेखील आरती यूट्यूबवर व्हिडीओ पाहत असल्याचे पाहून चेतन भडकला. त्याने रागाच्या भरात घरातील नायलॉनची रशी घेऊन आरतीचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत हत्येची कबुली दिली.
VIDEO | मल्लखांब खेळाच्या प्रचारासाठी यूट्यूब चॅनल | गुढी नवचैतन्याची | घे भरारी | एबीपी माझा