जय जवान मंडळ गिनीज बुकचं प्रमाणपत्र परत करणार
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 09:05 AM (IST)
मुंबई: कृष्णजन्माष्टमीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोविंदा पथकांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणाऱ्या जय जवान मंडळाने आपल्या विक्रमाचं प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक मनोऱ्यांचा स्पेनचा 22 वर्षांचा विक्रम या मंडळाने गेल्या वर्षी मोडीत काढला होता. दहीहंडीच्या खेळासाठी लागणारी सर्व सुरक्षाव्यवस्था आपण पाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं, या मंडळाचं म्हणणं आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्वांमध्ये नाराजी पसरल्याचं गोविंदा पथकाचं म्हणणं आहे.