Jain Community Morcha For Kabutar Khana मुंबई: मुंबईत जैन समाजाकडून 7 डिसेंबर रोजी मोठा मोर्चा (Jain community Morcha) काढण्यात येणार आहे. ‘जीव दया आणि कबुतर बचाव’ या अभियानाची सुरुवात जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराज (Nileshchandra Vijay) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल. हा मोर्चा कुलाबा जैन मंदिरातून सुरू होऊन लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअर परळ या मार्गे दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) जैन मंदिरासह इतर प्रमुख जैन मंदिरांपर्यंत जाणार आहे.
सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जैन समाजाकडून आक्रमक भूमिका- (Jain community Kabutar Khana)
यात्रेदरम्यान जैन समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रवचन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. अभियानाला व्यापक पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं जाईल. ‘जीव दया आणि कबुतर बचाव’ आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी निलेशचंद्रजी महाराज दादरमध्ये पुन्हा अनशन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जैन समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जे समाजाला तोडत आहेत त्यांची खैर- निलेशचंद्र महाराज (Nileshchandra Vijay)
निलेशचंद्र महाराज एबीपी माझाच्या महाकट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जैन समाज हा हजारो वर्षे प्राचीन धर्म आहे. कुणाची मंदिरं किंवा घरे पाडून जैन समाजाने जैनालय बांधलं नाही. हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे. पण आमचे विलेपार्लेचे मंदिर बुलडोझरने पाडलं, मग अवैध मशिदी पाडल्या का? दोन नेते मला भेटायले आहे, 15 दिवसांनी आम्ही तोडगा काढतो म्हणाले, पण तो निघाला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे जे गद्दार नेते आहेत, जे समाजाला तोडत आहेत त्यांची खैर नाही. माझे प्राण गेले तरी चालतील, पण त्यांना मी सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा जो संदेश दिला तो मी दिला आहे. जो हिंदी हिताची गोष्ट करेल, त्याला आम्ही समर्थन देऊ असं निलेशचंद्र महाराज म्हणाले.
जैन समाजाची पार्टी का नाही?- निलेशचंद्र महाराज (Jain Community Morcha For Kabutar Khana)
आगामी निवडणुकीमध्ये जैन समाज उतरणार का? याबाबत जैन मुनी निलेशचंद्र यांनी एबीपी माझाच्या माझा महाकट्ट्यावरती सविस्तरपणे भाष्य केलं आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही उतरणार का? या प्रश्नावर बोलताना जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले, हो मी पूर्ण भारतामध्ये प्रचार करेल, प्रत्येक समाजाची पार्टी आहे. तर जैन समाजाची पार्टी का नाही, आम्हाला काही गोष्टींसाठी इकडे-तिकडे पळायला लागतं. रस्त्यावर उतरायला लागतं. आम्ही शांत प्रिय समाज आहे. आम्ही कोणाच्याही लफड्यात पडत नाही. भांडणात पडत नाही. ज्या वेळी विदर्भात पूर आला त्यावेळी दोन करोड रुपये मी पाठवले तिकडे, देवेंद्र फडणवीस यांना आम्ही चेक दिला होता, महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिला होता ना, असे पुष्कळ उदाहरण आहेत, असंही निलेशचंद्र महाराज म्हणाले.