मुंबई :  दिनांक 4 ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

6 डिसेंबर 2025 रोजी 5.03 उंचीच्या लाटा उसळणार 

दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजून 39 मिनिटांनी 5.03 उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जावू नये. तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

वरीलनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतीचा तपशिल

 दिनांक 4 ते 7 डिसेंबर 2025 दरम्यानच्या भरतींचे वेळापत्रक... 

Continues below advertisement

१. गुरुवार, दि. 4 डिसेंबर 2025  रात्री 11 वाजून 52 मिनीटांनी लाटांची उंची - 4.96 मीटर

२. शुक्रवार, दि. 5 डिसेंबर 2025  सकाळी –11 वाजून 30 मिनीटांनी लाटांची उंची - 4.14 मीटर

३. शनिवार, दि. 6 डिसेंबर 2025  मध्यरात्री 12 वाजून 39 .-लाटांची उंची - 5.03 मीटर

४. शनिवार, दि. 6 डिसेंबर 2025 दुपारी – 12 वाजून 20 मिनीटांनी लाटांची उंची - 4.17 मीटर

५. रविवार, दि. 7 डिसेंबर 2025   -मध्यरात्री – 1 वाजून 27 मिनीटांनी लाटांची उंची - 5.01 मीटर

६. रविवार, दि. 7 डिसेंबर 2025  दुपारी – 1 वाजून 10 मिनीटांनी लाटांची उंची  - 4.15 मीटर

समुद्रात भरती असताना पाण्याची पातळी वाढते. भरतीच्या वेळी समुद्रात उंच लाटा येतात. 4.5 मीटर पेक्षा उंच लाटा असल्यास त्याला मोठी भरती असे बोलले जाते. मोठ्या भरतीच्यावेळी समुद्र किनारी किंवा समुद्रात जाणे धोकादायक असते.

महत्वाच्या बातम्या:

Montha Cyclone Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणमधील बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला