कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षेची सर्व काळजी घेऊ, असं आश्वासन जय जवान मंडळाने दिलं आहे.
18 वर्षांखालील गोविंदा, 20 फुटांपेक्षा उंच मनोरे नको : सुप्रीम कोर्ट
गिनीज बुकचं प्रमाणपत्र परत करणार
कोर्टाने लादलेल्या निर्बंधाविरोधात जय जवान मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचाच भाग म्हणून, गेल्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणाऱ्या जय जवान मंडळाने आपल्या विक्रमाचं प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक मनोऱ्यांचा स्पेनचा 22 वर्षांचा विक्रम या मंडळाने गेल्या वर्षी मोडीत काढला होता.
दहीहंडीच्या खेळासाठी लागणारी सर्व सुरक्षाव्यवस्था आपण पाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं, या मंडळाचं म्हणणं आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्वांमध्ये नाराजी पसरल्याचं गोविंदा पथकाचं म्हणणं आहे.
दहीहंडीसाठी कोर्टाचा निर्णय
दहीहंडीत 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे गोविंदा नकोत, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने यंदाच्या वर्षी हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. याशिवाय 20 फुटांपेक्षा जास्त मानवी मनोरे रचण्यासही कोर्टाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सध्यातरी हायकोर्टने 2014 साली दिलेला निर्णय कायम राहिल.
मात्र याला दहीहंडीमंडळांचा विरोध आहे. त्यासाठी अनेक दहीहंडी मंडळांनी मुख्यमंत्र्यांपासून अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.
राज ठाकरेंची भूमिका
कोर्टाने सगळीकडेच नाक खुपसण्याची गरज नाही. डोकं ठिकाणावर ठेवून कोर्टाने निर्णय घ्यावा. कोर्टाने दहिहंडीला नियमावलीत अडकवलं आहे. मग आता काय स्टूलवर उभं राहून दहीहंडी फोडायची का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
केवळ हिंदूंच्याच सणाला नियमावली का? मशिदीवरील लाऊड स्पीकर दिसत नाही का? बॉल लागेल म्हणून क्रिकेट खेळणं बंद करणार का? दुखापत होईल म्हणून ऑलिम्पिक रद्द करणार का, मग पारंपारिक दहिहंडीला नियमात का अडकवता? असे सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहिहंडीवरुन न्यायालय आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
मुख्यमंत्र्यांचं आवाहन
कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाता येणार नाही, असं म्हणत यंदा नियमात राहूनच दहीहंडी साजरी करा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी समन्वय समितीला दिला.
संबंधित बातमी
18 वर्षांखालील गोविंदा, 20 फुटांपेक्षा उंच मनोरे नको : सुप्रीम कोर्ट
जय जवान मंडळ गिनीज बुकचं प्रमाणपत्र परत करणार
स्टूलवर उभं राहून हंडी फोडू का? कोर्टाने नको तिथं नाक खुपसू नये : राज ठाकरे
नियमात राहूनच दहीहंडी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला
दहीहंडीत 12 वर्षांच्या गोविंदांना सहभागी होऊ द्या : सरकार