मुंबई: केवळ पुस्तक वाचून उद्योजक होता येत नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नमूद केलं. गुजराती माणूस हा हुशार आहे हे आता कळतंय, असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. मी उद्योजक होणारच या वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आयोजित कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. नुसतं पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही, असं यावेळी राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरे कार्यक्रमाला उशिरा आले. त्यावरुन मनोहर जोशींनी राज ठाकरेंना टोलाही लगावला.
राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
मी शिक्षक नसल्यामुळे भाषण 5 ते 10 मिनिटांत आटोपणार आहे. मी व्यवसाय सांगायला आलेलो नाही. तुम्ही तुमची अर्धी लढायी जिंकली आहे कारण तुम्ही तुमचा विचार ताजमध्ये करताय. मराठी माणूस मागे आहे हा भ्रम काढून टाका. सगळ्याच मारवाडी, गुजरातींनी दुकानं टाकली आहेत का? मराठी, महाराष्ट्राने असं पोषक वातावरण तयार केलं, म्हणून मारवाडमधले लोक व्यवसायासाठी इकडे आले, असं राज ठाकरे म्हणाले.
गुजराती माणूस हुशार असतो यात वाद नाही. ते आता कळतंय, असं म्हणत राज यांनी मोदींना टोला लगावला.
गुजराती माणूस गुजराती माणसाला कामाला ठेवत नाही, कारण त्याचा मनात भीती असते की हा काम करणारा मोठा होईल, असं राज यांनी नमूद केलं.
मनोहर जोशी म्हणतात ताज हॉटेल बांधायला पाहिजे होतं. मग का नाही बांधलं? शक्य झालं असतं. आणि पुस्तक वाचून कोणालाही धंदा करता येत नाही. ज्यांना कामधंदा नाही ते पुस्तकं काढतात, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
केवळ पुस्तक वाचून उद्योजक होता येत नाही : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Oct 2018 02:45 PM (IST)
मी उद्योजक होणारच या वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आयोजित कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -