मुंबई : आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी आरीब माजिदला तात्पुरता जामीन देण्यास मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने नकार दिला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आपल्या भावाच्या लग्नासाठी आरीब माजिदनं जामीनासाठी अर्ज केला होता. तपास यंत्रणेनं मात्र या अर्जाला जोरदार विरोध केला होता.
माजिदवरील आरोप हे फार गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे तो बाहेर आला तर पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. या अर्जावर एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एस.एम. भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली.
आरीब माजिदवर UAPA 16, 18 आणि आयपीसी सेक्शन 125 खाली आरोप ठेवण्यात आले आहेत. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसोबत दहशतवादी कृत्य करायला भारतातून कल्याणचे चार तरुण गेल्याची सर्वात पहिली बातमी मिळाली होती. त्यानंतर वर्ष 2014 मध्ये आरीब माजिद भारतात परतला होता.
इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आरीब माजिदसह कल्याणमधील चार मुस्लिम मागील वर्षी तरुण आयएसआयएस संघटनेत सहभागी होण्यासाठी गेले होते.