दोन्ही उमेदवारांना समान मतं पडल्यानं फेरमतमोजणी करण्यात आली. फेरमतमोजणीतही मतांमध्ये कोणताच फरक न पडल्यानं ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. ईश्वर चिठ्ठीने लॉटरी पद्धतीनं भाजपच्या अतुल शहांना विजयी घोषित करण्यात आले.
मात्र लॉटरी पद्धतीनं झालेला निर्णय मान्य नसल्यानं पाच टेंडर वोट मोजले जावेत यासाठी सुरेंद्र बागलकर कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.
ईश्वर चिठ्ठी भाजपच्या बाजूने, मुंबईत एक जागा वाढली
टेंडर मते म्हणजे काय??
- बुथवरील उमेदवार प्रतिनिधीने एखाद्या मतदाराबाबत आक्षेप घेतला आणि त्या मतदाराकडे मतदान करण्यापुरते पुरावे असल्यास त्या मतदाराला मतपत्रिकेद्वारे मतदान करू दिले जाते.
- म्हणजे त्याला ईव्हीएममध्ये बटण दाबून नव्हे तर स्वतंत्र मतपत्रिका दिली जाते.
- यामध्ये एकाच मतदाराच्या नावाने दुसरा मतदार आला तर त्याचेही मतदान होऊ शकते.
- परंतु हे मतदान मतमोजणीवेळी न मोजता कोर्टात उघडले जाते.
- प्रभाग क्रमांक 220 मध्ये अशी 5 मते आहेत. ही मते मोजण्यात यावीत, यासाठी सेनेचे सुरेंद्र बागलकर कोर्टाचे दार ठोठावणार आहेत.
काय आहे प्रकरण?
23 फेब्रुवारीला झालेल्या मुंबई महापालिकेच्या मतमोजणीत भाजपचे अतुल शहा आणि शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांना समान मतं पडली होती. त्यानंतर फेरमतमोजणीही करण्यात आली. मात्र फेरमतमोजणीनंतरही दोघांची मतं समान राहिल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेतला होता.
यावेळी त्याठिकाणी शिवसेनेकडून संजय राऊत, अरविंद सावंत, तर भाजपकडून राज पुरोहित आणि मंगलप्रभात लोढा आदी नेते उपस्थित होते. ईश्वर चिठ्ठीचा निर्णय झाल्यावर दोन्ही उमेदवारांची नावं चिठ्ठीवर लिहून टाकण्यात आली. एका चिमुरडीला मंचावर बोलावून ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात अतुल शहा यांचं नाव विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं.
व्हिडीओ :