मुकेश अंबानींच्या घरी दोन आठवड्यात दुसऱ्या साखरपुड्याची चर्चा रंगू लागली.
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी पुन्हा एका साखरपुड्याची लगबग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशाचा साखरपुडा झाल्यानंतर आता त्यांचा धाकटा मुलगा अनंतचाही साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे.
नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अंबानींच्या घरी दोन आठवड्यात दुसऱ्या साखरपुड्याची चर्चा रंगू लागली. अनंत आणि राधिकाचा गुपचूप साखरपुडा झाल्याचंही काही वृत्तात म्हटलं आहे.
मुकेश अंबानींची एकुलती एक मुलगी ईशाचा पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत 9 मे रोजी साखरपुडा झाला. तर त्याआधी मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाशचा दोन महिन्यांपूर्वी श्लोका मेहतासोबत साखरपुडा झाला. त्यानंतर आता अनंतनेही नंबर लावल्याचं म्हटलं जात आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. संबंधित बातम्यादररोज 21 किमी चालणं, 5 तास व्यायाम, अनंत अंबानीचे खडतर परिश्रम