मुंबई : जर तुम्ही गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी तेजस एक्स्प्रेसनं प्रवास करणार असाल, तर तुम्हाला आयआरसीटीसीकडून सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. कारण गणेशोत्सवादरम्यान तेजसच्या प्रवाशांना उकडीचे मोदक देण्याचा आयआरसीटीसीचा प्लान आहे.


उकडीचे मोदक हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ मानला जातो. आणि बाप्पाचा हा आवडता पदार्थ प्रवाशांना देऊन तेजस एक्सप्रेसचं वेगळेपणं सिद्ध करण्याची योजना रेल्वेनं आखल्याचं समजतंय.

गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची सर्वात जास्त संख्या असते. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा प्रवास अजून गोड करण्यासाठी कोकण रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान 21 मे पासून कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक तेजस एक्स्प्रेस धावू लागली. प्रवाशांकडून देखील तेजसला मोठा प्रतिसाद मिळतोय. कोकण रेल्वेमार्गावर नव्याने सुरु झालेल्या या हायटेक तेजस एक्स्प्रेसला गणेशोत्सवाच्या काळात चांगलीच मागणी आहे.

या गाडीला पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. गेल्या 21 मे रोजी रविवारी सकाळच्या सुमारास केवळ सहा तासांत पुढील चार महिन्यांतील हजारो तिकिटांची विक्री झाली होती.

संबंधित बातम्या

गणपतीसाठी 'तेजस' फुल्ल, कोकणातील चाकरमानी वेटिंगवर


तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा हेडफोन्सवर डल्ला


अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल


हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट


केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा… हायटेक ‘तेजस’ सज्ज!


मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!