Saurabh Tripathi: अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. त्रिपाठी यांना निलंबित करण्यासाठी महाराष्ट्राच्या गृह विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे.
त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हापासूनच ते बेपत्ता आहे. 16 मार्च रोजी पोलीस गुन्हे शाखेने त्यांना फरार म्हणून घोषित केलं आहे. त्यांना फरार घोषित केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या वसुली प्रकरणाची माहिती गृह मंत्रालयाला दिली होती. यासोबतच त्रिपाठी यांच्याविरोधात कोणते पुरावे सापडले असून त्यांच्यावर विभागीय कारवाई का करावी, हेही सांगण्यात आले होते. या प्रकरणी त्रिपाठी यांनी तक्रारदाराला फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधित काही ऑडिओ क्लिपही मुंबई पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली
या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस स्टेशन स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहितीही त्यांना नव्हती. त्यांच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे.
दरम्यान, अंगडियाकडून वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 3 पोलीस अधिकारी आहेत. याच दरम्यान अटकेनंतर पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांची झालेल्या पोलीस चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव बाहेर आले. त्यानंतर सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या