मुंबई : तुम्ही जर भूक लागल्यावर झटपट बनणारी मॅगी सारखी खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, नालासोपाऱ्यात एका व्यक्तीला मॅगीमध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत.
नालासोपारा पश्चिम येथील जयमाला इमारतीत राहणारे नितिन गोवळकर यांनी काल (रविवार) डी-मार्टमधून मॅगी विकत आणली. मात्र घरी मॅगी बनवायला घेतल्यावर त्यात चक्क अळ्या आणि किडे त्यांना आढळून आले.
या घटनेमुळे मॅगीबद्दल पुन्हा एकदा शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे तुम्हीही जर असे प्लास्टिकबंद खाद्यपदार्थ आणत असाल तर ते खाताना काळजी घ्या.
दरम्यान, या प्रकरणावर संबंधित कंपनीकडून अजून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
डी-मार्टमधून आणलेल्या मॅगीत किडे आणि अळ्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Apr 2018 12:23 PM (IST)
नालासोपारा पश्चिम येथील जयमाला इमारतीत राहणारे नितिन गोवळकर काल डी-मार्टमधून मॅगी विकत आणली. मात्र घरी मॅगी बनवायला घेतल्यावर त्यात चक्क अळ्या आणि किडे त्यांना आढळून आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -