मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीनं सहआरोपी आणि पती पीटर मुखर्जीला स्पीड पोस्टनं घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी सध्या तुरुंगात आहेत.
इंद्राणीनं सामंजस्यातून पीटर मुखर्जीपासून फारकत मिळवण्यासाठी नोटीस पाठवली आहे. घटस्फोटाच्या या नोटीसमध्ये स्पेन आणि लंडनमधील संपत्ती, बँकेतील फिक्स डिपॉझिट्स आणि अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांमधील गुंतवणुक यात विभागणी करण्याचा उल्लेख आहे.
10 नोव्हेंबर, 2002 साली पीटर आणि इंद्राणीचं हिंदू पद्धतीनं लग्न झालं होतं. तरी, घटस्फोटासाठी एकमेकांविरुद्ध कुठल्याही न्यायालयात अर्ज न करता सांमजस्यानं घटस्फोट घेण्यात यावा यासाठी इंद्राणीनं ही नोटीस पाठवली आहे.
दरम्यान पीटरच्या वकीलांनी अशी नोटीस अजून मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंद्राणी मुखर्जीकडून पती पीटर मुखर्जीला घटस्फोटाची नोटीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Apr 2018 12:15 PM (IST)
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीनं सहआरोपी आणि पती पीटर मुखर्जीला स्पीड पोस्टनं घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -