Mumbai Water Taxi: भारतातील पहिली दोनशे प्रवाशांची क्षमता असलेली हाय स्पीड वॉटर टॅक्सी आता मुंबईत सुरू होणार आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही वेसल बनवली आहे. तिचे नाव आहे 'नयन एलेव्हन'. 1 नोव्हेंबर पासून डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते मांडवा दरम्यान या नवीन वॉटर टक्सीची सेवा सुरू करण्यात येणार आहे. दिवसाला 6 फेऱ्या चालवल्या जातील. 


लवकरच बेलापूर ते गेट वें ऑफ इंडियापर्यंत या नवीन वॉटर टॅक्सीच्या फेऱ्या सुरू होतील. यात 2 क्लास आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह क्लास जिथे चारशे रुपये तिकीट असेल, तर दुसरा आहे बिजनेस क्लास जिथे 450 रुपये तिकीट आकारले जाईल. एक्झिक्युटीव्ह क्लास मध्ये 160 जणांची आसन क्षमता आहे तर बिजनेस क्लास मध्ये 60 जणांची आसन क्षमता आहे. डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते मांडवापर्यंत पोहोचण्यासाठी या वॉटर टॅक्सीला चाळीस मिनिटं लागतील. तर बेलापूर पासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाण्यासाठी केवळ एक तास या वॉटर टॅक्सीला लागेल. सध्या उपलब्ध असलेल्या इतर सर्व जलवाहतुकीच्या साधनांपैकी ही वॉटर टॅक्सी सर्वात जलद आणि सर्वात सुरक्षित मानली जात आहे. 


फीचर्स 



  • भारतातली पहिली हाय स्पीड वॉटर टॅक्सी ज्यामध्ये 200 प्रवाशांची क्षमता आहे.

  • या वॉटर टॅक्सी मध्ये आंतरराष्ट्रीय सर्व नियमांची पूर्तता करण्यात आलेली आहे.

  • उन्हाळा आणि हिवाळ्यासोबतच पावसाळ्यात देखील ही वॉटर टॅक्सी सुरू राहणार आहे.

  • संपूर्ण वेसलवर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत जेणेकरून सर्व ठिकाणी कॅप्टनला लक्ष ठेवता येईल.

  • ही व्यसन रात्रीच्या अंधारात देखील चालू शकणार आहे, अशा प्रकारचे ॲडव्हान्स नेव्हिगेशन सिस्टीम यात बसवण्यात आली आहे.

  • 16 नोट्स प्रतितास इतक्या वेगाने ही वॉटर टॅक्सी जाऊ शकणार आहे, तसेच या वॉटर टॅक्सीची 22 नोट्स प्रति तास गतीने चाचणी घेण्यात आलेली आहे. 

  • यामध्ये 6 व्हॅक्यूम टॉयलेट्स देखील आहेत.

  • हाय स्पीड साठी या वॉटर टॅक्सी मध्ये दोन अद्ययावत इंजिन लावण्यात आलेले आहेत.


दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक सीटच्या खाली लाईफ जॅकेट्स देण्यात आलेले आहेत. सोबतच आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यात येणारे 8 लाईफ rafts देखील यावर आहेत. आगीसारखी घटना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अंतर्गत स्प्रिंकलर्स लावण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी स्मोक डिटेक्टर लावले गेलेले आहेत.