I.N.D.I.A Mumbai Meeting LIVE Updates : इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा दुसरा दिवस, विविध मुद्द्यांवर चर्चा होणार

I.N.D.I.A Mumbai Meet : मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Sep 2023 03:56 PM
I.N.D.I.A. Meeting Live: संसदेच्या विशेष अधिवेशनावरुनही खर्गेंचा मोदींवर निशाणा

I.N.D.I.A. Meeting Live: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले? हे आम्हाला माहीत नाही. मणिपूर जळत असताना विशेष अधिवेशन बोलावले नव्हते, कोरोनाच्या वेळी लोक चिंतेत होते, तेव्हा नाही बोलावलं विशेष अधिवेशन, मग आता काय झाले? ते हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहेत.



 


I.N.D.I.A. Meeting Live: मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

I.N.D.I.A. Meeting Live: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बोलताना म्हणाले की, या बैठकीत सर्व नेत्यांनी सहकार्य केलं. केंद्र सरकारवर निशाणा साधत त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी 100 रुपयांनी दर वाढवतात आणि दोन रुपयांनी कमी करतात.

I.N.D.I.A. Meeting Live: आमच्या एकतेनंच सत्ताधाऱ्यांमध्ये भिती निर्माण झालीये : उद्धव ठाकरे

शिवसेना (UBT) चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आमच्या एकतेमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. इंडिया आणखी मजबूत होतेय 

I.N.D.I.A Mumbai Meet LIVE : मुंबईत इंडिया बैठकीचं आयोजन

I.N.D.I.A Mumbai Meet LIVE :  मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी, सोनिया गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. 

50 खोके कुठून दिले सांगा, दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसटीला दहा कोटी दिले : आदित्य ठाकरे

I.N.D.I.A Mumbai Meet LIVE :  "50 खोके कुठून दिले ते सांगा. दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटीला दहा कोटी दिले. स्वत:च्या कार्यक्रमाच्या खर्चावर बोला," अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत आरोपांना उत्तर दिलं आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी 45 हजारांच्या 65 खुर्च्या मागवल्या, उदय सामंत यांनी बैठकीचा खर्च मांडला

I.N.D.I.A Mumbai Meet LIVE : मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या खर्च मंत्री उदय सामंत यांनी मांडला. "45 हजारांच्या 65 खुर्च्या या बैठकीसाठी मागवण्यात आल्या आहेत. चौदा ते पंधरा तासांच्या बैठकीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातोय. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आमच्या हॉटेलचा खर्च काढण्यात येत होता. ग्रँड हयायमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे," असं उदय सामंत यांनी म्हटलं.

हा डरपोकांचा मेळावा, इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन आशिष शेलार यांचा निशाणा

I.N.D.I.A Mumbai Meeting LIVE : हा डरपोकांचा मेळावा आहे. कारण हे भाजपचा सामना एकट्याने करु शकत नाही. पोरखेळ यासाठी म्हणतो त्याचे कारण उद्धव ठाकरे यांचे वाक्य बालिशपणा आणि पोरखेळ वाटावा असे आहे. आम्ही पंतप्रधान म्हणून एक उमेदवार नेमूच शकत नाही. जगाचे नेतृत्व करायला निघालेला भारत देश, पण इतके बालिश वक्तृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आयुष्य ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा द्वेष केला त्यांची पत्रावळ्या तुम्ही उचलतात. ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्याची पत्रावळ उबाठा उचलत आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन केली.

हा डरपोकांचा मेळावा, इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन आशिष शेलार यांचा निशाणा

I.N.D.I.A Mumbai Meeting LIVE : हा डरपोकांचा मेळावा आहे. कारण हे भाजपचा सामना एकट्याने करु शकत नाही. पोरखेळ यासाठी म्हणतो त्याचे कारण उद्धव ठाकरे यांचे वाक्य बालिशपणा आणि पोरखेळ वाटावा असे आहे. आम्ही पंतप्रधान म्हणून एक उमेदवार नेमूच शकत नाही. जगाचे नेतृत्व करायला निघालेला भारत देश, पण इतके बालिश वक्तृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आयुष्य ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा द्वेष केला त्यांची पत्रावळ्या तुम्ही उचलतात. ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्याची पत्रावळ उबाठा उचलत आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन केली.

I.N.D.I.A Mumbai Meet LIVE : इंडिया बैठकीसाठी मेहबूबा मुफ्ती दाखल 

I.N.D.I.A Mumbai Meet LIVE :  मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीसाठी मेहबूबा मुफ्ती या मुंबईत दाखल झाल्या आहेत. 

मुंबईत ग्रॅण्ड हयात हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फ्लेक्स पोलीस आणि महापालिकेने हटवले

I.N.D.I.A Mumbai Meet LIVE :  कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठी ग्रॅण्ड हयातकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फ्लेक्सची गर्दी मुंबई पोलीस आणि महापालिकेने हटवली आहे. अनेक महत्त्वाचे नेते ग्रॅण्ड हयात परिसरात दाखल होत असल्याने विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी फ्लेक्स लावण्यात आले होते. मात्र, एबीपी माझाने वृत्त दाखवताच ही सर्व फ्लेक्स आणि बॅनर्स पोलिसांकडून हटवण्यात आले आहेत. दरम्यान, मोठ्या फ्लेक्सऐवजी झेंडे आणि फक्त इंडिया आघाडीचे अधिकृत बॅनर्सच या संपूर्ण परिसरात लावण्यात आल्याचं दिसत आहे.

इंडियाला वाचवण्यासाठी इंडियाचा प्रयत्न : मधू अण्णा चव्हाण

I.N.D.I.A Mumbai Meeting LIVE : केंद्रात सरकारने जनतेचे हाल केले आहेत. विविध प्रश्नांनी देश ग्रासला आहे. या सरकारला पायउतार करण्यासाठी 28 पक्ष एकत्र आलो आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. इथे अनेक नेते येणार आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहोत. देशाच्या विकासासाठी बैठकीत अजेंडा ठरणार आहे. इंडियाला वाचवण्यासाठी इंडियाचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते मधू अण्णा चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

मुंबईत डरपोकांचा मेळावा "घमेंडीया" नावाने संपन्न होतोय, आशिष शेलार यांची टीका

I.N.D.I.A Mumbai Meet LIVE :  ज्यांनी ज्यांनी काल-परवापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला, ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या, अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे. फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना...महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना, जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली आहे. 

मुंबई विमानतळाच्या जनरल एव्हिएशन गेट क्रमांक आठ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

I.N.D.I.A Mumbai Meeting LIVE : आज आणि उद्या इंडियाची बैठक मुंबईत होत आहे. इंडियाच्या बैठकीमध्ये सहभागी असणाऱ्या पक्षातील नेते कालपासून मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. आज देखील इंडियाच्या बैठकीला महत्त्वाचे नेते हे मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईतील जनरल एव्हिएशन गेट क्रमांक आठ विमानतळावरुन अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, हेमंत सोरेन, भगवंत मान हे नेते मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे जनरल एव्हिएशन गेट क्रमांक आठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, तसेच एअरपोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे.

सध्याची परिस्थिती गंभीर, त्यामुळे एकत्र आलोय : डी. राजा

I.N.D.I.A Mumbai Meet LIVE : विरोधी पक्षाची ताकद आजच्या मीटिंगच्या निमित्ताने पाहिला मिळेल. आम्ही सर्व वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी भाजपला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. उद्या संयोजक कोण असेल याबाबत चर्चा होईल. सध्याची परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रिया कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डी. राजा यांनी मुंबईत आल्यानंतर दिली.

इंडिया बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बाळासाहेबांच्या जुन्या वक्तव्यांचे बॅनर्स, ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न

I.N.D.I.A Mumbai Meeting LIVE : इंडियाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बाळासाहेबांच्या जुन्या वक्तव्यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशा मजकुराचे बॅनर्स वरळी, सांताक्रूझ, वांद्रे परिसरात लावण्यात आले आहेत. बॅनर्समधून  शिवसेना ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे बॅनर कोणी लावले आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु बॅनर्स विरोधकांनी लावले असल्याची चर्चा आहे.



INDIA Mumbai Meeting LIVE : तुमची बैठक म्हणजे गरुड झेप नाही तर श्वापदांची टोळी : चंद्रशेखर बावनकुळे

I.N.D.I.A Mumbai Meeting LIVE : मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. "मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया‘ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप‘ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. मा. मोदीजी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांचा टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, करोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदीजींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न‘ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदीजींना जेवढ्या शिव्या द्याल जनता मोदीजींवर तेवढं जास्त प्रेम करेल. महात्मा गांधीजींनी ‘क्विट इंडिया‘चा नारा याच मुंबईतून दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावं लागलं. आता पुन्हा एकदा तोच ‘क्विट इंडिया‘चा नारा देऊन तुमच्या सारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे. मा. मोदीजींचा तुमच्या(I.N.D.I.A.)विरोधातील संघर्ष हा स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी नाही तर देश वाचविण्यासाठी आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव ‘ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन मोदीजींच देशसेवेचं कार्य अखंड सुरू राहणार आहे."

पार्श्वभूमी

I.N.D.I.A Alliance : मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा अध्यक्ष कोण असावा, आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं, यावरही चर्चा होईल. दरम्यान इंडिया आघाडीचा लोगो अनावरण लांबणीवर पडलं आहे. गुरुवारी (31 ऑगस्ट) संध्याकाळी सर्व 28 पक्षांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनावर चर्चा झाली


विरोधकांच्या इंडिया आघाडीची (I.N.D.I.A) 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील 'ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. 


देशभरातून येणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आली आहे. ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार आहे. पार्लेश्वर ढोल पथक मुलींची लेझीम पथक ग्रॅण्ड हयात इथे सर्व नेत्यांचे स्वागत करतील. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात मध्ये उपस्थित राहतील. साडेसहा वाजता इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल. तर आठ वाजता उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलां आहे. डिनरमध्ये खास महाराष्ट्रीयन मेन्यू ठेवण्यात आला आहे.


'इंडिया'ची ताकद वाढली


या इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. यापूर्वी या आघाडीत 26 राजकीय पक्षांचा समावेश होता, आता ती संख्या 28 इतकी झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्रातील डाव पीडब्लूपी(PWP) आणि आणखी एक प्रादेशिक पक्ष इंडियामध्ये सामील झाले आहेत. 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


'या' मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार


काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती, जागावाटपाचा फॉर्म्युला, लोगो आणि किमान समान कार्यक्रम यावर या बैठकीत चर्चा होणार आहे." दरम्यान इंडिया आघाडीच्या निमंत्रक व समन्वय समितीच्या सदस्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.