मुंबई : मुंबईतील हवेत धुलिकणांची संख्या वाढत आहे. मुंबईकर अनुभवत असलेली गुलाबी थंडी आपल्या सोबत धुलिकण घेऊन आली आहे. ही परिस्थिती 31 डिसेंबरपर्यंत कायम असणार असल्याची माहिती सफर संस्थेने दिली आहे.
पारा घसरल्याने आणि वाऱ्याची गती कमी झाल्याने आर्द्रता वाढून धुलिकणांची संख्या वाढल्याचा अहवाल सफर या संस्थेने दिला आहे. यामुळे ज्यांना दम्याचा, अस्थम्याचा त्रास आहे अश्या लोकांना श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो.
मुंबईतील हवेत 2.5 पीएम धुलिकणांची संख्या वाढलीय. यामुळं ३१ डिसेंबरपर्यंत हवामान ढगाळ राहणार आहे.
दरम्यान, ज्यांना दमा, अस्थम्याचा त्रास आहे त्यांनी मास्क घालूनच किंवा महिलांनी स्कार्फ तोंडाभोवती गुंडाळूनच घराबाहेर पडावे. नव्या वर्षातही मुंबईत थंडी कायम राहणार असल्याच अंदाज आहे. परंतु तोवर हवेतील धुलिकणांचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.