मुंबई : 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील श्याम शाहू, प्रविण टक्कलकी आणि शिवनारायण कालसंग्रा या तिघांची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील एनआयए कोर्टाने हा फैसला दिला आहे.

राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे यांच्यावरील अनेक कलमंही हटवण्यात आली आहेत. दोघांवर केवळ शस्त्रास्त्र अधिनियमा अंतर्गत खटला चालणार आहे.

मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरण

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 100 जण जखमी झाले होते. मालेगावात एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणं आणि कट रचल्याच्या आरोपाखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.

तब्बल 9 वर्षानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित जेलबाहेर!


एनआयएने साध्वी प्रज्ञासिंहसोबत सहा जणांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितलाही जामीन मंजूर झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने 9 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कर्नल पुरोहितला जामीन मंजूर केला.

एनआयएने नव्याने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय रहिरकर, सुधाकर चतुर्वेदी,  सुधाकर द्विवेदी या सर्वच आरोपींवरचा मोक्का काढला होता. त्यामुळे कर्नल पुरोहितच्या सुटकेचा मात्र मोकळा झाला होता.



संबंधित बातम्या :


तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार


ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?


2008 मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला अखेर जामीन


मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?


लेफ्टनंट कर्नल पुरोहित आज तुरुंगाबाहेर येणार!