नवी मुंबई : पोहण्यासाठी डबक्यात उतरलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पनवेल येथे घडली आहे. पनवेल रेल्वेस्थानकाजवळ डबक्यांमध्ये या तीन मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या. परंतु त्याचवेळी या तिघींचा बुडून मृत्यू झाला. रोहिता येरलाल भोसले, रेशम हल्दीशेठ भोसले आणि प्रतीक्षा भोसले अशी या तीन मुलींची नावे असून तिघींचे वय 7 ते 10 इतके आहे.
पनवेल स्थानकालगत अंडरपास तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या परिसरात काही खड्डे खणले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे जवळच राहणाऱ्या या तीन मुली दुपारी दोनच्या सुमारास पोहण्यासाठी डबक्यात उतरल्या होत्या.
या तीनही मुलींचे परिवार आमरावतीवरून पनवेलमध्ये उदरनिर्वाहासाठी आले आहेत. तीनही मुलींचे आई-वडील कामावर गेल्यानंतर घरात असलेल्या मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.