BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या 227 वार्डांपैकी 150 जागांवरती महायुतीचे एकमत झालं आहे. उर्वरित 77 जागांची चर्चा सुरू आहे, आणि ही चर्चा लवकरच पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली. आज अमित साटम आणि उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. अमित साटम म्हणाले की, उर्वरित जागांवर अंतिम निर्णय राज्याचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमत करतील. जागावाटपाचा फॉर्म्युला हा आहे की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचे आहे. मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुती कटिबद्ध आहे.

Continues below advertisement

महायुतीचा महापौर विराजमान होईल

त्यांनी सांगितले की, कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही, महायुती 227 जागा लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर विराजमान होईल. 25 वर्षे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, मुंबई विकून खाल्ली, आणि आता मतांच्या लांगुलचालनाकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, तो प्रयत्न हाणून पाडणे हे महत्त्वाचे आहे. भाजप, शिवसेना आणि रिपाई महायुती इतकी घट्ट आहे की, धनुष्यबाण कमळ हे दोन्ही एकच आहे. शेवटी महत्त्वाचे आहे की, महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि मुंबईकरांसाठी काम करणं. ते म्हणाले की, नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आमचं काही देणंघेणं नाही. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळे, जोपर्यंत ते निर्दोष मुक्त होत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही.

150 ठिकाणी आमचं एकमत झालं आहे 

उदय सामंत म्हणाले की, 150 ठिकाणी आमचं एकमत झालं आहे. 77 जागांवर चर्चा होईल. जागा किती कोण लढत याच्यापेक्षा आम्ही महायुतीने पुढे जात आहोत. शिवसेना, भाजप, आरपीआय ही महायुती अतिशय चांगल्या पद्धतीने असली पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे. अमित शाहांनी सांगितल्याप्रमाणे, आम्ही 150 जागांपेक्षा जास्त जागा 100 टक्के जिंकणार आहोत. उर्वरित 77 जागांपैकी काही जागांवर मतभेद राहिल्यास त्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील. ते म्हणाले की, युती कुठल्याही विषयावरन तुटणार नाही, जागा वाटप सोडा इतर कुठल्याही विषयावरन युती तुटणार नाही. कारण मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या