मुंबई : मुंबईच्या अंधेरी (Andheri) पूर्व परिसरातील पंप हाऊस परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. गावठी दारु (Liquor) प्यायल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. गावठी दारु प्यायलेल्या या चारही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. दावठी दारु पिऊन विषबाझा झाल्याने एकाचा मृत्यू तर चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं.
दारु पिऊन झोपले, दिवसभर दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांचा पोलिसांना कॉल
अंधेरीतील पंप हाऊस परिसरात एका घरात पाच कामगार राहत होते. मंगळवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनाची त्यांना सुट्टी होती. ड्राय डे असूनही चारही कामगार गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरामधून गावठी पिऊन घरी आले आणि त्यानंतर झोपून गेले. मात्र हे चौघे कामगार घरात 15 ऑगस्टच्या संध्याकाळी झोपल्यानंतर काल दिवसभर त्यांनी दरवाजा उघडला नाही. यानंतर शेजारच्या लोकांनी पोलिसांना कॉल केला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन दार उघडलं. त्यावेळी एक कामगार मृत्यूमुखी पडल्याचं निदर्शनास आलं. तर चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचं दिसलं. हे कामगार 18 ते 20 वर्षे वयोगटातले असल्याचं समोर येत आहे..
चौघांची प्रकृती चिंताजनक
यानंतर एमआयडीसी पोलिसांनी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. सध्या या चौघांवर रुग्णालयाची आयसीयूमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.
हेही वाचा